महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात महा- रक्तदान शिबिराचे आयोजन !

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हे औचित्य साधत राष्ट्रीय कार्य म्हणून महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर एकाच वेळी 13 नोव्हेंबर रविवार रोजी महा रक्तदान शिबिर आयोजित केले असून सर्व जिल्हा व तालुका ठिकाणी रक्तदाना संबंधी भव्य तयारी चालू असून रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष गाठी भेटी सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमार दत्तात्रय गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त गतवर्षी राज्यभरात एकाच वेळी 26 ऑक्टोबर रोजी महा रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यावेळी सुमारे १८६६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून विक्रम केला होता तर यावर्षी हे महा रक्तदान शिबिर राज्यभरात एकाच वेळी 13 नोव्हेंबर रविवार रोजी आयोजित करण्यात आले आहे सर्वत्र या शिबिराची तयारी चालू आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून यावेळी गावातील व शहरातील व्यापारी प्रतिष्ठित नागरिक नियमित रक्तदाते अशा रक्तदात्यांना आवाहन केले आहे या रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळणार असल्याची माहिती महासभेचे राज्य संघटक प्रदीप कोकडवार यांनी दिली असून या महा रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय कुंचनवार केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या