येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी जगदुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम च्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी एकूण १८५ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन नायगाव नगर पंचायत चे उपनगरध्यक्ष विजय पा चव्हाण यांच्या शुभ हस्ते जगदुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपर्णा पुपलवाड, नगरसेवक पंकज पा.चव्हाण, नगरसेवक शिवाजी पा कल्याण, भाजपाचे शहराध्यक्ष माधव पा कल्याण, नगरसेवक विठ्ठलराव बेळगे, साईनाथ सावकार वठ्ठमवार, राम सावकार मद्रैवार,शंकर पाटील कल्याण ब्रम्हानंद पाटील, सरपंच गंगाधर बेलकर,पोलीस निरीक्षक मारकड, बिट जमादार साईनाथ सागविकर या सह आदींची उपस्थिती होती.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज नाणीजधाम संस्थान यांच्या सामाजिक उपक्रमातुन राज्यात ४ ते १९ जानेवारी या पंधरवड्यात रक्तदान महायज्ञ शिबिर सुरू असून बारा दिवसांत ८९९ केंद्रावर संकलन करण्यात आले यात ९५ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती नांदेड जिल्हा निरिक्षक तथा तेलंगणा पिठाचे पिठ प्रमुख काकासाहेब वनारसे यांनी सांगितले.नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दि.१६ जानेवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन नायगाव तालुका स्व – स्वरूप संप्रदाय सेवा समितीच्या वतीने करण्यात आले होते यात १८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष किशन मुंडकार, बल्ड काॅप जिल्हा प्रमुख रवी शाहने, जिल्हा सामाजिक प्रमुख अशोक चरपलवाड, जिल्हा बल्ड इन जिल्हा प्रमुख ऐडके दयानंद, जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख सगीताताई साखरे, ज.न.म.प्ररवचेकर गंगाधर कोकणे, तालुकाध्यक्ष शेषेराव नारसनवाड, सचिव शेषेराव कंधारे, महिला अध्यक्ष गंगाबाई डाके , व्यंकटराव पवारे, लक्ष्मण पुपलवाड,विश्वजित फुलारी, सुभाष पेरके, ज्ञानेश्वर मोरे, राजेश म्हात्रे, गोविंद एसके, पंडीत पांडे,सगिता पांडे, अवधुते रविंद्र,मारोती शिदे, लताबाई पाटील , झगडेताई, चंद्रकांत जाधव ,शिवराज पाटील, काशिनाथ पाटील, विनायक पाटील ब्रम्हानंद कंटेवाड, सुमित्रा ढाणे श्रीराम वडजे, साई कल्याण सह नायगाव तालुक्यातील सर्व संतसंग सेवा केंद्र, आरती सेवा केंद्रातील सर्वच गुरुबंधू व गुरुभगीनी यांनी परीश्रम घेतले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy