कुंडलवाडीत रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यांनी केले रक्तदान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरात दिनांक 15 नोव्हेंबर रोजी मुनवर मस्जिद समोरील ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक येथे ऑल इंडिया तनजिम – ए- इन्साफ या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिरात शहर व परिसरातील 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेश जिठ्ठावार, उपनगराध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार सय्यद इस्ताक अली, वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे, डॉ.नरेश बोधनकर, नगरसेवक शेख मुख्तार, मराठवाडा सदस्य सादक तांबोळी, मुखेड तालुकाध्यक्ष असद बल्खी, तालुका सरचिटणीस मोतीपाशा पाळेकर, मुक्रमाबाद अध्यक्ष जलील पठाण, ए.जी.कुरेशी, सय्यद रियाज, प्रा.मोहसीन खान, शेख फारुख, शेख बाशीद, काझी सिराज, मोहम्मद अफजल, सिराज पट्टेदार व्यंकट श्रीरामे उपस्थित होते.
यावेळी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी,नांदेड ब्लड बँकचे डॉ.शितल गजले (बी.टि.ओ.), शरद आवचार (समाजसेवा अधिक्षक), बाबुराव गायकवाड लाँब टेक्निशक), मयुर पाटील (बर्दर), अब्दुल शेख, शेख हामीद यांनी कक्षसेवक म्हणून काम पाहिले तर रक्तदान शिबिर संपन्न होण्यासाठी ऑल इंडिया तनजिम -ए-इन्साफचे कुंडलवाडी शहराध्यक्ष अब्दुल माजीद नांदेडकर, एम.एम.शेख, फयुम खान, पत्रकार सिध्दार्थ कांबळे, शेख सलमान, शेख बाशीद, शेख रहिम, शेख अशपाक, शेख ताहेर, अब्दुल समर, इरफान पठाण, अजर कुरेशी, शेख जब्बार, शेख रज्जाक, शेख मोबीन, शेख अहमद, शेख उस्मान आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन रक्तदान शिबिर व्यवस्थित रित्या संपन्न केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या