नायगावात महा रक्तदान शिबिरात 61 रक्तदात्यांनी सहभाग घेतला

[ नायगाव ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या आदेशानुसार नायगावात महा रक्तदान शिबिराचे आयोजन महासभेचे सदस्य व आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने केले होते. या महारक्तदान शिबिरात एकूण 61 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.     

 

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष तथा काशी अन्नपूर्णाचे तिरुपतीचे उपाध्यक्ष नंदकुमार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नायगावात भव्य महार रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व आर्य वैश्य समाज बांधव यांच्या वतीने आर्य वैश्य महासभा अध्यक्ष तथा श्री काशी अन्नपूर्णा सत्रम चे उपाध्यक्ष श्री नंदकुमारजी गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर डॉ पोलावार यांच्या दवाखान्यात दिनांक 22 नोव्हेंबर रोज मंगळवार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजे पर्यंत आयोजित केले होते.

या महारक्तदान शिबिराचे उद्घघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून श्री . केशवराव पाटील चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, महासभेचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण विजयकुमार कुंचनवार, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण जाधव, गटशिक्षणाधिकारी कदम, नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाचावार, डॉक्टर पोलावार, नगरसेवक प्रतिनिधी संजय चव्हाण, यांच्यासह मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या उपस्थितीत महा रक्तदान शिबिराचे उद्घाटन आर्य वैश्य समाज बांधवांची कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी व परमपूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेस पूजन व दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष विजय कुंचनवार यांनी रक्तदान शिबिराचे महत्व समाज बांधवांना पटवून सांगितले महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सदस्य साईनाथ मेडेवार, धनंजय कवटीकवार, वट्टमवार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी,रमेश चिद्रावार, सतीष लोकमनवार, पवन गादेवार, सचिन चिद्रावार, सूर्यकांत कवटीकवार, चंद्रकांत बच्चेवार, गणेश कोंडावार, कपिलेश्वर नलबलवार, मारोती कत्तुरवार, मनोज अरगुलवार विकास आरगुलवार, राम सावकार मद्रेवार, राजू गादेवार, संगम सावकार व सर्व नायगाव आर्य वैश्य समाज बांधव व मुनिम संघटना यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या