युवा नेते नगरसेवक पंकज पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने 314 नागरिकांनी रक्तदान केले.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
 तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार कै बळवंतराव चव्हाण यांचे नातू माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे पुतणे तर माजी पंचायत समिती सदस्य हनमंतराव पाटील यांचे चिरंजीव नायगाव नगरपंचायतीचे नगरसेवक युवा नेते पंकज पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी आमदार वसंतराव चव्हाण मित्र मंडळाचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात 314 नागरिकांनी रक्तदान केले, तसेच नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप ,वृक्षारोपण, अपंग विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

तर भगवान बालाजी मंदिरात बालाजीचे दर्शन घेऊन नायगाव येथील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणामध्ये अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य माधव आप्पा बेळगे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच अभिष्टचिंतन सोहळ्यात नगरसेवक पंकज पाटील यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून केशवराव पाटील चव्हाण, संभाजी पाटील भिलवंडे, संजय पाटील शेळगावकर, मनोहर पवार, आनंदराव पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, हणमंतराव पाटील चव्हाण , श्रीनिवास पाटील चव्हाण,रवींद्र पाटील चव्हाण, वसंत सावकार मेडेवार, बालाजीराव वडजे गुरुजी संगमनाथ सावकार कवटीकवार, माधवराव पाटील जाधव, कृष्णरकर ,शिवराज पाटील शिंदे मांजरमकर, यांच्यासह शिवम नगर मित्र मंडळ ,व्यापारी मित्र मंडळ, आर्य वैश्य समाज बांधव, प्राचार्य ,शिक्षक वर्ग, मतदारसंघातील मतदार बंधू, कार्यकर्ते ,प्रमुख मान्यवरांचे उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत श्रीनिवास चव्हाण तर सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले रक्तदान शिबिरात डॉक्टर गुलाबराव वडजे, डॉक्टर विश्वास चव्हाण, डॉक्टर पोलावार, डॉक्टर शेख अनिस, डॉक्टर कवठेकर, डॉक्टर प्यादेकर, यांनी रक्तदान शिबिरात सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब शिंदे,संजय पाटील चव्हाण, पांडू पाटील चव्हाण, माणिक चव्हाण, रवींद्र भालेराव, दयानंद भालेराव, नारायण पाटील जाधव, विठ्ठल बेळगे,दत्तामामा येवते, माजी आमदार मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केलेमोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या