युवा नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिरास व अभिष्टचिंतनासाठी चाहत्यांनी केली मोठी गर्दी.

 ●● महारक्तशिबिरात एकूण 560 रक्तदात्यांनी रक्तदान केले ..
[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी]
माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांचे चिरंजीव युवा नेते प्राचार्य रवींद्र पाटील चव्हाण व श्रीधर पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने सकाळी साडेनऊ वाजता पानसरे नगराचे साईबाबा मंदिरात व स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने दोन्ही सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला.

नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जनता हायस्कूलच्या प्रांगणात प्रा.रवींद्र पाटील चव्हाण, श्रीधर पाटील चव्हाण यांचा शिक्षक प्राध्यापक प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वागत केले दुपारी साडेअकरा वाजता नगरपंचायतीच्या वतीने व आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले मतदार संघातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, माधवराव बेळगे, हनमंतराव पाटील चव्हाण , श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, संजय पाटील शेळगावकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय अप्पा बेळगे, गजानन चौधरी,पांडू पाटील चव्हाण, माणिक चव्हाण, संजय चव्हाण, साईनाथ चन्नावार, दयानंद भालेराव, रवींद्र भालेराव, विठ्ठल बेळगे, सुनील लुंगारे, दत्ता पाटील डोईफोडे, साईनाथ ताटे, यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या