नायगावात महा रक्तदान शिबिराचे आयोजन !

[ नायगाव तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष तथा काशी अन्नपूर्णाचे तिरुपतीचे उपाध्यक्ष नंदकुमार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नायगावात भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व आर्य वैश्य समाज बांधव यांच्या वतीने आर्य वैश्य महासभा अध्यक्ष तथा श्री काशी अन्नपूर्णा सत्रम चे उपाध्यक्ष श्री नंदकुमारजी गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर डॉ.पोलावार यांच्या दवाखान्यात दिनांक 22 नोव्हेंबर रोज मंगळवार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजे पर्यंत आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून श्री . केशवराव पाटील चव्हाण (माली पाटील) म, श्री.विजय शंकरराव पाटील चव्हाण (उपनगराध्यक्ष – नायगाव नगरपंचायत ), श्री विजयकुमार कुंचनवार (अध्यक्ष –आर्य वैश्य महासभा ग्रामीण ) श्री. नरेंद्र येरावार – (प्रसिद्धी प्रमुखआर्य वैश्य महासभा ) श्री. अभिषेक शिंदे (पोलिस निरीक्षक) नायगाव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे हि विनंती महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे सदस्य व नायगाव आर्य वैश्य समाज बांधव कार्यकारणी यांनी केली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या