मागच्या महिन्यापासुन एकनाथ शिंदे सह अनेक शिवसेनेचे नेते शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागले आणि शिंदे गटाच सरकार स्थापन झाल.
“गाय डोंगार, काय झाडी, काय हाटेल ” म्हणत समदा ओके कार्यक्रम सत्तासंघर्षाचा महाराष्ट्र बघत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यावर दौरे करून दिल्लीचा भरपूर आशिर्वाद मिळवला.
या सगळ्या घडामोडींत कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपते की काय ? असा सुर देशभरातून उमटू लागला. पण अशातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ सामान्य शिवसैनिक एकवटला असल्याच दिसून येत आहे.
लोहा तालुक्यातील शिवतेज प्रतिष्ठाण चे सुरज तेलंग या कार्यकर्त्यांने शिवसेनेच्या समर्थनार्थ रक्ताने पत्र लिहून महाराष्ट्राच लक्ष वेधून घेतल आहे. आयुष्यभर शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याच या पत्रात लिहील आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy