दिव्यांग,वृध्द निराधार मेळावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.
ऊमरी पासुन जवळच असलेल्या तळेगाव येथे दिव्यांंग, वृध्द, निराधारांचा १८२ व्या शाखेचे अनावरण व मेळावाच्या अध्यक्षस्थानी दि.वृ.नि.मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे हे होते.
तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य महिला कामगार संघटनेच्या अध्यक्ष विमलताई साळवे, माजी प.स.सभापती शिरीषभाऊ गोरठेकर, भाजपा ता.अध्यक्ष सुधाकरराव देशमुख, शेतकरी नेते मारोतराव कवळे, दि.वृ.नि.जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, ता.गजानन वंहिदे, ता.सचिव माधवराव पाटिल तहसिल चे प्रतिनिधी मन्मथ मुगटकर, आरटिआय कार्यकर्ते संपादक बेग फराद, अनेक पत्रकार, पोलिस स्टेशनचे बिट जमादार, ऊमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते, जाधव दता पाटिल, रमेश हैबते सर, सर्व ग्रा.प. सदस्य, सर्व प्रतिष्ठित नागरिक, नेत्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक भाषण माजी केंद्रप्रमुख खतगावे सर यांनी केले. मेळाव्याचा उद्देश सांगितला. सुरेख सुत्रसंचलन रमेश हैबते सरांनी केले.
तालुकास्तरीय मेळ्यात सर्व दिव्यांग,वृध्द, निराधार बांधवांनी आपल्या हक्कांची सवलतीची माहिती व्हावी व शासन प्रशासनास जागे करण्यासाठी संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय आपले हक्क मिळत नसल्यामुळे दि.वृ.निराधार मि.मं. संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर हे सतत न्याय हक्कासाठी आपणास हक्काच्या सवलती मिळाव्यात म्हणुन गाव तिथे शाखा स्थापन करुन जनजागृती करुन शासन प्रशासनास जागे करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. पण दिनदुबळ्यांना न्याय हक्क मिळावा म्हणून स्टेजवरच्या नेत्यांनी तालुकास्तरावर आपले वजन खर्च करून प्रशासकिय अधिकारी यांच्या सोबत मेळावा आयोजित करून न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती ता.सचिव माधवराव पाटिल यांनी केली असता शिरिषभाऊ गोरठेकर यांनी मेळाव्याची जबाबदारी घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले.
या मेळव्यास वरील सर्व मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना दिव्यांग असुन सुद्धा दिव्यांचा,वृध्द, निराधार दिनदुबळ्याना न्याया साठि संघटित करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल डाकोरे यांच्या कार्याचे कौतुक करून न्यायासाठी आम्हि आपल्यासोबत असल्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द, निराधार बांधवांनी बोर्डाचे अनावरण केले, त्याचे पाच फायदे सांगितले.
१) बोर्डाचे अनावरण केल्यामुळे दिव्यांग वृध्द, निराधारांच्या योजनेत भष्टाचार होनार नाहि, निधी ची चोरी होनार नाहि, झाली तर ते तक्रार करतील हि भिती राहील. २) बोर्डामुळे कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळेल, ३) निवडणुकीत संघटनेचा पाठिंबा द्यावा म्हणुन महिलांना साडी वाटप, छत्र्या वाटप, टि शर्ट वाटप, कॅलेंडर वाटप करुन प्रचारात आघाडी घेतली जाईल.
४) बोर्डा मुळे दिव्यांचा, वृध्द, निराधारांना कुणी त्रास, छळ करनार नाहित कारण त्यांची संघटना आहे हे वचक राहिल.
दिव्यांग,वृध्द, निराधार यांचे मिळणारे अनुदान वाढ व ते वेळेवर मिळेल म्हणून संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहिच मिळणार नाहि. जसे “देरे हारी पंलगावरी” म्हणल्याने काहीच मिळत नसल्यामुळे सर्वांनी संघटितपणे संहभागी व्हावे असे आवाहन करत चंपतराव डाकोरे पाटिल यांनी अध्यक्षिय समारोप केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळेगाव ता ऊमरी येथील जि.प.सर्कल प्रमुख गंगाधर खंडेलोट, शा.अध्यक्ष शेख नासिर, शा.ऊप अध्यक्ष नागनाथ खतगावे, कैलास बसवते, गणेश गणगोपलवाड, दिपक कवडीकर, शा.म.अध्यक्ष शोभाबाई बनपवाड, रत्नमाला शिलेदार, कौसल्याबाई नरवाडे, गोदावरी आरगुडवार, महादाबाई ईरपे इत्यादी असून प्रसिद्धी पत्रक सचिव माधवराव पाटिल यांनी दिले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy