बोधन – बिलोली – मुखेड -लातूर रेल्वेचा प्रश्न लवकरच मार्गी लावु- खा.चिखलीकर

■ पेट्रोलियम कमिटी चा सदस्य आहे,CNG कुठे द्याची आणि कुठे नाही हे माझ्या हातात आहे. – खा.प्रतापराव पा.चिखलिकर

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले मला खात्री आहे . उद्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये बोधन – बिलोली – मुखेड -लातूर रेल्वेचा प्रश्न निश्चित प्रमाणे मार्गीलावु असे म्हणाले नांदेड मध्ये 72 रेल्वे नांदेडच्या इतिहासात पहिल्यांदाच धावत आहे.त्यांचा श्रय भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जात आहे. गेल्या 35 वर्षांपासून नांदेड- देगलूर – बिदर रेल्वेचा प्रश्न होता मी लोकसभेत गेल्यावर प्रश्न मांडले असे मंचावर खा. चिखलीकर बोलत होते.

बिलोली शहरातील विकास कामासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी 1 कोटी रुपयाचा निधी दिला असुन त्यांचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कासराळी व्यापारी भागवत लोकमनवार यांच्या मनोहर पेट्रोल पंप चे उद्घाटन नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दि २६ जानेवारी रोजी २ वाजता करण्यात आले. उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुभाष साबने हे होते.

यावेळी संस्कृत संवर्धन मंडळचे प्रमोद देशमुख, माजी भाजपा माजी महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, श्रीराम सेठ मेडेवार ,मधु गिरगावकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे,लक्ष्मणराव ठक्करवाड,माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे , जगदीश कदम ,भिमराव जेठे, मारोती पटाईत, विजय कुंचनवार,शिवाजी मामा कंनकंटे ,उमाकांत गोपछडे, शंकरराव मावलगे, शांतेश्वर पाटील,श्रीनिवास पाटील गुजरीकर, चंद्रशेखर पाटील सावळीकर ,भाजपा शहराध्यक्ष इंद्रजित तुडमे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज, बळवंत पा.लुटे.शेख युनुस ,यांच्या व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक, गावकरी सह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या