ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांच्या ‘शाळा’ कादंबरीचा नायगाव येथे २५ रोजी प्रकाशन समारंभ !

[ नायगाव बा.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील प्रथितयश लेखक ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर यांच्या ‘शाळा’ या शैक्षणिक विश्वातील महत्त्वपूर्ण कादंबरीचा प्रकाशन समारंभ दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जि. प. कन्या हायस्कूल, नायगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
 या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व नांदेड जि. म. सह. बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण हे राहणार आहेत. ‘शाळा’ कादंबरीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षणसंचालक गोविंद नांदेडे यांच्या हस्ते होणार आहे. तर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, संजय बेळगे, नगर पंचायतचे उपाध्यक्ष विजय शंकरराव पा. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी मोहनराव कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार, प्रा डॉ. जगदीश कदम, देवीदास फुलारी, शंकर वाडेवाले व शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. सविता बिरगे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी वीरभद्र मिरेवाड हे करणार आहेत.
 तरी साहित्यिक व साहित्यप्रेमींनी या प्रकाशन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे, मुख्याध्यापक आनंद रेनगुंटवार, सोपान देगावकर व भाऊसाहेब वडजे यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या