प्रा.डॉ.जगदिश जायेवार यांच्या दोन ग्रंथांचे प्रकाशन !

• लातूर येथे प्रकाशन सोहळा संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील रहिवाशी व सध्या संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदिश जायेवार लिखित ” स्वामी विवेकानंद यांचे शेक्षणिक विचार” आणि भारतीय शिक्षण: युगपुरुषांचे योगदान ” या दोन स्वलिखित पुस्तकांचे प्रकाशन सोहळा दि.१३ रोजी लातूर येथील स्व.दगडोजीराव देशमुख सभाग्रहात भव्यदिव्य असा पार पडला.

त्यांचा हा दुसरा आणि तिसरा ग्रंथ होय. यापूर्वी ” लोकराजा राजर्षी शाहू” हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. हा प्रकाशन सोहळा महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेच्या लातूर येथील अधिवेशनाच्या कार्यक्रमात पार पडला. प्रसंगी उदघाटक म्हणून स्वा.रा. ती. म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत, माजी जि. प. अध्यक्ष पंडितराव धुमाळ, माजी महापौर मा. सुरेश पवार, विकास काका शिंदे विभागीय चिटणीस शे.का.प., प्राचार्य पी.एन. सगर, मा वसंत शिंदे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, मा. व्यंकट जाधव अध्यक्ष महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यासह लातूर परिसरातील प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, अभ्यासक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या