कार्यकारी संपादक श्री.आंधळे सर यांची भापट येथे वाचनालयाला पुस्तके भेट !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा २८ आक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता रयतेचा कैवारी या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक श्री. मीठ्ठू त्रिंबक आंधळे रा श्रीवर्धन यांनी आज भापट येथील साने गुरुजी बालभवन वाचनालय या वाचनालयाला २५ पुस्तके भेट दिली.
याप्रसंगी आज वाचनालयात वाचक विद्यार्थ्यांची कंदील बनवणे कार्यशाळा आणि चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ३० विद्यार्थी पहिली ते सातवीचे सहभागी झाले होते यांना मार्गदर्शन म्हणून कला टिचर श्री ईमत्याज नजिर यांनी केले. आज लाभलेले प्रमुख पाहुणे श्री मीठ्ठू आंधळे साहेब , शिक्षण प्रेमी काशिमशेठ मेमन, कला टिचर ईमत्याजजी नजिर, गाव अध्यक्ष प्रविण ठोंबरे,लक्ष्मण मोहिते, संभाजी शिंदे सर, सिध्दांत शिंदे सर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जयसिंग बेटकर सर यांनी केले.
आंधळे साहेब यांनी सांगितले आजच्या युगात जरी डिजिटल युग आले असले तरी वाचनिय पुस्तके आवश्यक वाचले पाहिजे. भविष्यातील स्पर्धापरिक्षेचे नियोजन करून या दुर्गम भागातील विद्यार्थी पुढे गेले पाहिजे, या वाचनालयाचा पुर्णपणे लाभ मिळवला पाहिजे, भापट गावात साने गुरुजी बालभवन वाचनालय स्थापन करून एक नविन दिशेची व्यावस्था उपलब्ध केल्याबद्दल भापट ग्रामस्थ आणि वाचनालय (ग्रंथालय ) व्यावस्थापक यांचे कौतुक केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या