अलिबाग तालुक्यातील BSNL चा भोंगळ कारभारावर मनसेचे आसुड !

[ अलिबाग प्रतिनिधि – अभिप्राव पाटील ]
अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथिल राजेश टेमकर हे bsnl चे ३० वर्ष ग्राहक आहेत, त्यांची इंटरनेट सेवा २ नोव्हेंबर रोजी बंद झाली होती. याची तक्रार bsnl चे टेक्निशन पवार व अलिबाग येथिल अधिकारी कोळी साहेब यांना त्याचवेळी केली परंतू ११ नोव्हेंबर पर्यंत टेमकर यांना फक्त वेगवेगळी कारणे देऊन टाळत होते. राजेश टेमकर यांनी BSNL च्या या भोंगळ कारभारा बद्दलची तक्रार मनसेचे नेते देवव्रत पाटील यांना केली.
 तेव्हा मनसेचे नेते देवव्रत पाटील. वेळकाढून BSNL च्या ऑफिसमध्ये गेले.कामाचा जाब विचारण्यासाठी देवव्रत पाटील स्वतः राजेश पाटील यांच्यासोबत अलिबाग येथिल BSNL च्या कार्यालयाला भेट देऊन तेथिल अधिकारी कोळी यांना या दिरंगाई बद्दल खडसावले व तात्काळ टेमकर यांच्या टेलेफोन लाईन मधिल दोष दुर करण्यास सांगितले.
मनसे दणक्यानंतर सर्व सुत्र वेगात फिरून टेमकर यांची BSNL सेवा चालु करण्यात आली. त्यानंतर राजेश पाटील यांनी मनसेचे नेते देवव्रत पाटील यांचे आभार व्यक्त केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या