बसपा नेते दिलीप रंगारी अनंतात विलीन !

🔹बहुजन समाज पार्टीचे नागपुरातील ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार कळमना मार्केट मधील मोठे फळ (फ्रुट) व्यापारी दिलीप रंगारी यांचे वयाच्या 55 व्या वर्षी आज हृदयविकाराने निधन झाले. आज 25 डिसेंबर ला गंगाबाई घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

🔹याप्रसंगी बसपा चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. भाऊ गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी विविध संस्था, संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. त्यात बसपाचे प्रदेश महासचिव जितेंद्र महेशकर, पृथ्वी शेंडे, ए जी तिरपुडे, उत्तम शेवडे, धर्मा बागडे, सुनील सूर्यवंशी, सुरेश साखरे, अनिल धारकर, अब्दुल रज्जाक कुरेशी, नगरसेवक संजय जयस्वाल, नागेश सहारे, सागर लोखंडे, जितेंद्र घोडेस्वार, विश्वास राऊत, राजेंद्र बनसोड, नागोराव जयकर, संजय रंगारी, संदीप मेश्राम, महेश सहारे, सागर डबरासे, अजय उके, मुकेश मेश्राम, आशिष फुलझले, आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

🔹दिलीप रंगारी हे बसपाचे स्टार प्रचारक होते. त्यांनी 2014 ला पूर्व नागपूर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्यांनी फुटपाथ दुकानदार संघटनेची स्थापना करून गणेश पेठ बसस्टॉप परिसरात, कॉटन मार्केट तसेच कळमना मार्केट येथे आपल्या फुटपाथ दुकानदार संघटनेला मजबूत केले होते.

🔹रंगारी ह्यांनी बसपा च्या पूर्व नागपूर विधानसभा अध्यक्ष, नागपूर शहर महासचिव, जिल्हा प्रभारी व प्रदेश सचिव आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
🔹कळमना मार्केट येथील व्यापारी व बसपाचे सर्व नेते कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात या प्रसंगी उपस्थिती होती.

*🌹उत्तम शेवडे, कार्यालय सचिव व मीडिया प्रभारी महाराष्ट्र प्रदेश बसपा🐘👏*

ताज्या बातम्या