धर्माबाद येथे बुद्ध भीम जयंती महोत्सव उत्साहात संपन्न !

[ धर्माबाद प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर ]
20 मे 2022 रोजी धर्माबाद येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुलेनगर बंनाळी रोड धर्माबाद या ठिकाणी संपन्न झालेल्या बुद्ध भीम जयंती महोत्सव 2022 च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमतः भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पूजा विधी संपन्न झाले.

या नियोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विधिमंडळ गटनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य अमरनाथ राजूरकर हे होते. फुले नगर येथे महापुरुष डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या वाहस्ते करण्यात आले. देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जीतेशजी अंतापूरकर, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, वी.पी.के समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी, मा.सभापती शिक्षण व बांधकाम समिती जिल्हा परिषद नांदेड चे माननीय संजय अप्पा बेळगे, माजी महापौर नांदेड चे प्रतिनिधी किशोरजी भवरे, नांदेड मनपा चे नगरसेक संदीप सोनकांबळे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अब्दुल्ला साहेब, सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती राम पाटील बंनालीकर, धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.कमल किशोर काकांनी, माजी नगराध्यक्ष नगरपालिका धर्माबाद विनायकराव कुलकर्णी, बाभळी बंधारा कृती समितीचे धर्माबाद अध्यक्ष नागोराव पाटील रोषणगावकर, माझी जिल्हा परिषद सभापती दत्तात्रेय रेड्डी, काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस वर्णी नागभूषण, एसी फोर एसी राइट्स संस्थापक-अध्यक्ष एम सायलू दादा म्हैसेकर, धर्माबाद चे भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सदानंद देवके, माजी सभापती पंचायत समिती धर्माबाद मारुती कागेरू, सदर हाजी उलताफ साहब, काँग्रेस कमिटीत शहराध्यक्ष जाहीर पठाण, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जी.पी. मिसाळे, वंचित बहुजन आघाडीचे गौतम देवके, प्रभारी जामा मझिद धर्माबाद मोईन खान साब, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटीचे अर्चना माधव शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष योगिता किरोळे, धर्माबाद पत्रकार संपादक सेवा संघाचे अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा तिमापुरे, युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान कांबळे, धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबूराव पाटील आलूरकर, जिल्हा उपाध्यक्ष युवक कांग्रेस चे बालाजी शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कावडे, टिपू सुलतान बिग्रेडचे मराठवाडा सचिव नविद आहेमंद भाई, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद सुलताना, एम आय एम चे तालुका अध्यक्ष सय्यद रईसोद्दीन, यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या नियोजित बुद्ध भीम जयंती महोत्सवात कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका व तसेच बहुजन बांधवांची उपस्थित होते. तद्नंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुणाल वराळे व त्यांच्या संच यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, फुलेनगर धर्माबाद च्या वतीने नियोजित कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मोईजोदिन सलिमोदिन करखेलीकर बिडीवाले, माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद व समस्त मित्रपरिवार धर्माबाद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
सायंकाळी चार ते रात्री उशिरा पर्यंत सर्वांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला. ताहेर पठाण यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विषद केली. मुख्य आयोजक मोईज सेठ, मारोतराव कवळे गुरुजी, आमदार अमरभाऊ राजूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताहेर पठाण यांनी केले तर प्रा. सुधाकर वाघमारे यांनी आभार मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या