उमरी शहरांत बुद्ध जयंती निमित्त कॅन्डल मार्च.

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
उमरी शहरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त उमरी शहरातील प्रमुख रस्त्याने कॅन्डल मार्च ची रॅली काढण्यात आली. दि. 23 रोजी सकाळी ठीक दहा वाजता रापतवार नगर येथील लिंम्बुनि बुद्ध विहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी बांधकाम सभापती ईश्वरराव विठ्ठलराव सवई तर प्रमुख पाहुणे रतन खंदारे माजी नगरसेवक, गजानन आरगुलवाड सामाजिक कार्यकर्ते अनिल सोनकांबळे, माजी उपनगराध्यक्ष, त्रिरत्न गंगाधर सवई पत्रकार उपस्थित होते.

सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर पुष्प पूजा धूप पूजा करून अभिवादन करण्यात आले, तसेच अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी सात वाजता रापतवार नगर येथून कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली.
तसेच आंबेडकर नगर येथून महिला पुरुष कॅण्डल मार्चमध्ये सहभागी झाले आणि म्हाडा कॉलनी, पंचशील नगर येथील महिला पुरुष कॅण्डल मार्चमध्ये सहभागी झाले. उमरी शहरातील प्रमुख रस्त्याने निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी येऊन मेणबत्ती प्रज्वलित करून तथागत भगवान गौतम बुद्ध याना अभिवादन केले तसेच त्रिशरन पंचशील ग्रहण करून सांगता करण्यात आले शेवटी या कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झालेल्यांचे व पोलीस प्रशासनाचे आभार गंगाधर सवई यांनी मांनले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या