बुद्ध पहाट संयोजन समितीची शनिवारी बैठक !

[ प्रतिनिधी – जयवर्धन भोसीकर ]
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल आणि कल्चरल मुहमेंट निर्मित संगीतकार प्रमोद गजभारे प्रस्तुत बुद्ध – भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम बुद्ध पहाट या सलग तेराव्या वर्षाच्या कार्यक्रमा च्या आयोजनासाठी दि. शनिवारी सायंकाळी ठीक ५ वाजता बुद्ध पहाट संयोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्ववंदनीय महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त मागील बारा वर्षापासून आंबेडकरी सांस्कृतीक चळवळीत आपले अगळे वेगळे स्थान निर्माण करणारा कार्यक्रम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शोशल अँड कल्चरल अॅण्ड मुहमेंट निर्मित प्रमोद गजभारे प्रस्तुत बुद्ध पहाट या बुद्ध भीम गीतांचा संस्कृती कार्यक्रमाचे मागील सलग १२ वर्षापासून यशस्वी आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात आज पर्यंत राज्यातील व शिने सृष्टीतील प्रख्यात गायक,गायिका कलावंत व संगीतकारांनी हजेरी लावलेली आहे हे तेरावे वर्ष असून यावर्षी ही १६ मे पहाटे ठीक ५ वा.कै शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे बुद्ध जयंतीनिमित्त बुध्द पहाट या कार्यक्रमाचे अयोजन केले आहे त्या अनुशंघाने दि.२६ मार्च शनिवार रोजी सांयकाळी ठीक ५ वाजता संयोजन समिती पदाधिकारी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व धम्म बांधव यांच्या उपस्थितीत रोहीदास कांबळे यांचे निवास प्रकाश नगर तरोडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीस संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास कांबळे, प्रमोद कुमार गजमारे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे, रविंद्र संगनवार, टी.पी.वाघमारे, वसंत सोनकांबळे सर, देवीदास ढवळे सर, दिनेश सूर्यवंशी, सुरेश गजभारे, यशवंत कांबळे, शेख नजीर, अरुण केसराळीकर, नागोराव ढवळे, बालाजी कांबळे, डी.टी.हनुमंते आदींची उपस्थिती असणार असुन सदर बैठकीमध्ये यावर्षीच्या बुध्द पहाट कार्यक्रमाच्या तयारी संदर्भात नियोजन केले जाणार आहे. अशी माहिती बुद्ध पहाट संयोजन समितीचे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार सुभाष लोणे यांनी माहिती दिली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या