बुद्ध गया सारनाथ जाणाऱ्या यात्रेकरूंना सुखी प्रवासासाठी शुभेच्छा !

[ बिलोली – सुनिल जेठे ]
दिनाक ७ मे रोजी बिलोली शहरातील बौद्ध गया तिर्थक्षेत्राला निघालेल्या बौध्द उपासक,उपसिका यात्रेकरूंना त्यांच्या सुखी प्रवास व्हावे म्हणून मित्र परीवराकडून शुभेच्छा देण्यात आले.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेल्या महु,अशोक कालीन स्तुप सांची, लखनौ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व भगवान बुद्धांनी वास्तव केलेले ठिकाण श्रावस्ती आहे.
नेपाळ येथील तथागत भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान लुंबीनी, कुशीनगर येथील तथागत भगवान गौतम बुद्धांचे महानिर्वाण झालेले ठिकाण बौद्ध विहार वैशाली, नालंदा विद्यापीठ, शांती स्तूप राजगीर, बौद्ध गया,सारनाथ, प्रसिद्ध बौद्ध विहार मनसर आहे.
 ड्रॅगन पॅलेस कामठी,नागपुर येथील दीक्षाभूमी अशा प्रवासासाठी बिलोली येथील श्रीमती विमलबा का.दिगांबर जाधव, सेवानिवृत्त रोखपाल गंगाधर मरिबा कांगठे, आनंदीबाई गंगाधर कांगठे,गंगाधर तुकाराम जाधव, पुजा गंगाधर जाधव यांच्या सह तालुक्यातील बौद्ध बांधव यांना पुढील प्रवासाठी बिलोली शहरातील नागरिकांनी पेढा भरवुन तोंड गोड करुन शुभेच्छा दिल्या.
 यावेळी भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष राजकुमार गादगे,शिलरत्न जाधव, साईनाथ शिरोळे अविनाश गाडेकर, प्रा.बालाजी बोटेवाड आकाश पवार, धर्मराज जाधव, सहशिक्षक संतोष वाघमारे, संघपाल जाधव, दिलीप सोनकांबळे यांच्या सह आंबेडकर नगर येथील बौद्ध बांधव व महिला मंडळी उपस्थिती होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या