बुलडाणा अर्बन लोहा शाखेच्या वतीने श्रीराम मंदिरात महाआरती व वृक्षारोपन !

[ विशेष प्रतिनिधि – रियाज पठान ]
आज २आक्टोबर रोजी लोहा येथील गाडगेबाबा नगरातील श्रीराम मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात वृक्षारोपन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बुलडाणा अर्बन को.आप क्रेडिट सोसायटी शाखा लोहाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त तसेच बुलडाणा अर्बन को.आप.क्रे.पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात महाआरती व वृक्षारोपन कार्यक्रम नगरसेवक भास्कर पाटील पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी नगरसेवक भास्कर पाटील पवार यांनी आपल्या भाषणात बुलडाणा अर्बन संदर्भात आशिया खंडात नावारूपाला आलेली अग्रगण्य अशी पतसंस्था असल्याचे पतसंस्थेविषयी गौरवोद्गार काढले. बुलढाणा अर्बन च्या एकूण ठेवी दहा हजार कोटीच्या वर, तर कर्ज वाटप साडेसात हजार कोटी, एकूण सभासद संख्या 722532 असून देशभरात एकूण शाखा ४६५ च्या वर असून १७५००कोटींचा आर्थिक व्यवहार करणारी आशिया खंडात सर्वात मोठी एकमेव पतसंस्था असल्याचे प्रतिपादन केले. शाखा व्यवस्थापक केशवराव शेटे यांच्या माध्यमातून लोहा तालुक्यात बुलढाणा अर्बन को.आप.क्रे. पतसंस्था ग्राहकांना अतिशय उत्कृष्ट सेवा देत असल्याचेही प्रतिपादन केले.
याप्रसंगी नगरसेवक भास्कर पाटील पवार यांच्या हस्ते श्रीराम मंदिरात महाआरती व वृक्षारोपण करून भाईजीना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली.
यावेळी नगरसेवक भास्कर पाटील पवार, माजी मुख्याध्यापक जे.आय. शिंदे, मंदिर समितीचे एन.डी. शेंडगे, पत्रकार संजय कहाळेकर,फिरोज मणियार, बुलडाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक केशव माधवराव शेट्टे,कंधारचे शाखा व्यवस्थापक शशीकांत शेटे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक राजीव जैन,समाजसेवक रवी वाघमारे, बालाजी चव्हाण, पप्पू चव्हाण, रोखपाल ओम प्रकाश सोनवळे, प्रवीण कदम, अक्षय माळोदे, अंकुश गीते, दत्ता दांगटे, अल्प ठेव प्रतिनिधी सचिन महाजन, बालाजी ईरमलवार, किशोर गुडमेवार, सोने तपासणीस श्रीकांत ढगे आदींसह उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोखपाल ओमप्रकाश सोनवळे, प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक केशवराव शेट्टे यांनी मनोगत नगरसेवक भास्कर पाटील पवार सह कर्मचाऱ्यांनी मांडले तर आभार श्रीकांत ढगे यांनी मानले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या