एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवानंद पांचाळ यांचा जाहीर पाठिंबा !
[ लातूर – ता १६ नोव्हेंबर ]
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला रोटी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ रोहित माडेवार यांच्या मार्गदर्शनानुसार रोटी फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी पाठींबा घोषित केला असून या पाश्र्वभूमीवर लातूर छत्रपती शिवाजी एसटी बस डेपो येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शिवानंद पांचाळ यांनी भेट देऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला जाहीर पाठिंबा दिला.
पाठिंबा दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई करू नये. एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन. आर्थिक समस्यांमुळे चाळीस हुन अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या. कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे. आज एसटी कर्मचारी- कामगार जगला तरच एसटी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ एक तारखेला वेतन राज्यसरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करणे व आदी मागण्या आहेत.
अनेक चालक- वाहक तुटपुंज्या वेतनावर काम करतात विना वेतन काम ज्यादा तास काम कमी मनुष्यबळ ज्यादा कामाचा बोजा अशा अडचणी त्यांच्या समोर आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून घरसंसार व मुलाबाळांकडे दुर्लक्ष होत कामगारांच्या मुलांना शिक्षण व अडचणी येत आहेत. एसटी सर्व सामान्यांचे प्रवास साधन आहे तिची चाके रूतून बसली तर जनजीवन सुरळीत राहणार नाही. ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व त्यांच्या प्रश्र्नांची गांभीर्यपूर्वक विचार करण्याची वेळ शासन प्रशासन.राज्यकर्ते. सामाजिक संघटना व सर्व सामान्यांवर आली आहे.
शिवशाहीच्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना मोगलशाही सारखी वागणूक का दिली जात असल्याचा सवाल रोटी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी उपस्थित केला.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करा.