देऊळगाव उगले व पिंपलखुटा गटग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द !

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव उगले व पिंपालखुटा गट ग्रामपंचायतिचे सरपंच लक्ष्मीबाई सीताराम कणखर यांचे गैरव्यवहार व स्वतःच्या मुलाच्या नावाने ग्रामपंचायतीच्या निधीतून धनादेशाद्वारे पैसे काढल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी 18 जानेवारी 2022 रोजी त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले होते. मा.जिल्हाधिकारी जालना यांच्या उक्त आदेशाच्या नाराजीने विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या समोर अपील दाखल केले होते.
यावेळी गैरअर्जदारा तर्फे ॲड. सुरेश पिडगेवार यांनी मा. जिल्हाधिकारी जालना यांनी परित केलेला आदेश योग्य असून तोच कायम ठेवण्यासाठीचा युक्तिवाद केला.
सप्टेंबर 2017 मध्ये लक्ष्मीबाई कणखर जनतेतून निवडून आले होत्या. मात्र त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी धनादेशद्वारे सरपंचाचा मुलाच्या नावाने 17 एप्रिल 2017 रोजी 8 हजार रुपये तर 24 जुलै 2017 रोजी 40000 हजार रुपये असे एकूण 48000 हजार रुपये बँक ऑफ महाराष्ट्रचा धनादेश वट वटवल्याची तक्रार उत्तम उगले यांनी केले होते.
यासह ग्रामसभा न घेणे, विकास कामांना खीळ घालने, पाणी पुरवठा, गावची स्वच्छ्ता याकडे लक्ष न देता ग्रा. पं. च्या व शासनाच्या पैसाचे नुकसान करण्याचे तक्रार केली. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी 18 जानेवारी 2022 रोजी त्यांचे सरपंच पद रद्द केले होते.
मा.जिल्हाधिकारी जालना यांच्या उक्त आदेशाच्या नाराजीने विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या समोर अपील दाखल केले होते यावेळी गैरअर्जदार (मूळ तक्रारदार) तर्फे ॲड.सुरेश पिडगेवार तमलुरकर यांनी बाजु मांडली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या