नुसतेच स्वप्न न बघता ध्येयाच्या दिशेने विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी ! – मारोतराव कवळे गुरुजी यांचे प्रतिपादन !

पत्रकार संरक्षण समिती धर्माबाद द्वारा आयोजित गुरु गौरव व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न !

[ धर्माबाद प्रतिनिधि – चंद्रभीम हौजेकर ]
कुंभार जसा मातीला आकार देऊन मडकी बनवतो त्याचप्रमाणे शिक्षकही अगदी निरपेक्ष भावनेने बालमनावर संस्कार करीत त्यांना ज्ञानामृत पाजत असतात. पण आपल्याकडे बुद्धीचा भंडार आहे याचा अनेक विद्यार्थ्यांना ऐन उमेदीच्या काळात विसर पडतो. बुद्धीचा वापर करणे आपल्याच हातात आहे. तेव्हा आयुष्यात वेळ न दवडता बुद्धीचा वापर करीत नुसतेच स्वप्न न बघता आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी असे प्रांजळ प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी धर्माबाद येथे आर्यभवनात केले. पत्रकार संरक्षण समिती धर्माबाद द्वारा आयोजित गुरु गौरव व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 2022 या आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.

उपरोक्त कार्यक्रमाचे उद्घाटक काँग्रेसचे युवा नेते तथा नगरसेवक प्रतिनिधी शंकरअण्णा बोल्लमवाड, स्वागताध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे धर्माबाद तालुका सल्लागार जे. के‌. जोंधळे, तर प्रमुख उपस्थितांमध्ये बाजार समितीचे संचालक गोविंद पाटील जाधव रोशनगावकर, शिवराज पाटील मोकलीकर, हिंदू युवा संघटनेचे अध्यक्ष सतीश मोटकूल,लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी उप प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पी. जे. थोटे, हुतात्मा पानसरे हायस्कूलचे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक टी.जी. तुरे, विस्डम शाळेचे प्राचार्य औसाजी जाधव, इंदिरा गांधी पब्लिक स्कूल शाळेचे खान सर, नगरसेवक संजय पवार, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख राजू सिरामणे,भाजपाचे शहराध्यक्ष रामेश्वर गंधलवाड, शिवा संघटनेचे वीरभद्र बसापुरे, कवळे गुरुजी यांचे स्नेही ढोल उमरीचे चेअरमन गणेशराव पाटील, बाबू पाटील नरवाडे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सदानंद देवके, पत्रकार गंगाधर धडेकर, भगवान कांबळे, यांच्यासह बहुतांशी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, विविध शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रतिनिधीक स्वरूपात ज्येष्ठ शिक्षक यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकात संपादक तथा पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य डॉक्टर सुधीर येलमेण यांनी सतत अकरा वर्षे घेत असलेल्या सदरील उपक्रमाबद्दल माहिती देत धर्माबाद तालुक्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्राच्या जडणघडणीत ज्या नवरत्नांचा सिंहाचा वाटा आहे त्या मान्यवरांचे कौतुक करणे व विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी भविष्याच्या जडणघडणीत प्रेरणा देण्यासाठी गुरुगौरव व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे प्रतिवर्षी आपण आयोजन करीत असतो असे सांगितले.

पत्रकार संरक्षण समिती तर्फे यावर्षी आदर्श शिक्षकांचा पुरस्कार सेवानिवृत्त हुतात्मा पानसरे हायस्कूलचे शिक्षक टी.जी.तुरे व वीरभद्र बसापुरे यांना देण्यात आला तर पत्रकारितेत अलीकडच्या काळात मोठे योगदान देणारे गंगाधर धडेकर व भगवान कांबळे यांना संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात आला. आणि दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या शहरातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना विस्डमशाळेचे प्राचार्य औसाची जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्मिक असे मार्गदर्शन केले. तर स्वागताध्यक्ष जेके जोंधळे यांनी आपले लहानपणीचे अनुभव व सद्यस्थिती यांची सांगड घालत विद्यार्थी दशा ते नोकरीतील सेवानिवृत्ती इथपर्यंतचा प्रवास सांगत विद्यार्थ्यांना पुढे जाण्याचा कानमंत्रच दिला. गणेश गिरी यांनी आपल्या मनोगतात सर्वच इंग्रजी शाळांच्या संस्था कसे कार्य करीत आहेत हे जणू काही सर्वच पालकाची भूमिका आपल्या मनोगतातून मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कदम यांनी केले.तर आभार प्रदर्शन मोहम्मद मुबशीर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे कृष्णा जाजेवार, मोहम्मद मुबशिर, डॉक्टर सुधीर येलमे, चंद्रभिम हौजेकर आदींनी अथक परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी भारवले होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या