जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर न केलेल्या व अधिसंख्य ठरलेल्या आदिवासी कर्मचारी / अधिकारी यांच्या जागी मुळ आदिवासी उमेदवारांची विशेष भरती करा !

  • नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांना आफ्रोट संघटनेचे निवेदन.
नांदेड : जातवैधता प्रमाणपत्र अद्यापही सादर न केलेल्या व अधिसंख्य ठरलेल्या बोगस आदिवासी कर्मचारी यांच्या जागी मुळ आदिवासी उमेदवारांची विशेष भरती घेवुन नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज आफ्रोट संघटने तर्फे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या आदिवासी कर्मचारी व अधिकारी यांना नोकरीतुन काढुन टाकुन त्यांच्या जागी मुळ आदिवासी उमेदवारांची विशेष भरती घेवुन निवड करण्याचे आदेश असतांनाही नांदेड जिल्ह्यात अद्याप भरती प्रकीया हि पुर्ण झाली नसल्यामुळे आफ्रोट संघटना आक्रमक झाली आहे. येत्या 8 दिवसात सदरील बाबी संदर्भांत काय कार्यवाही झाली ते संघटनेस कळवण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. तर येत्या 15 दिवसात विशेष भरती प्रकीयेला सुरूवात नाही झाली तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून संघटने तर्फे कोर्टात याचिका दाखल करून जिल्ह्यातील संपूर्ण मुळ आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आफ्रोट संघटनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी डाॅ. हनुमंतजी रिठ्ठे, अरूण डाकोरे, जोतिबा हुरदुखे, संतोष तायवाडे, ॲड.गणेश तोरकड, डाॅ.बळीराम भुरके, सत्यनारायण मुरमुरे, ॲड.सुरेश पवार, शंकर मारकड, विष्णू मेटकर, लक्ष्मण येळणे, किसन खोकले उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या