देशातली हजारो वर्षांची गुलामी संपवायची असेल, तर जातीअंताचे आंदोलन झाले पाहिजे – प्रकाश आंबेडकर

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क// दिनांक ०५|११|२०२२ ]
भारत जोड़ो यात्रा सुरू आहे. चांगलं आहे. पण, जोडण्याचा मुद्दा काय? जे तुटलं असेल ते जोडता येते. खऱ्या अर्थाने देशातली हजारो वर्षांची गुलामी संपवायची असेल, तर जातीअंताचे आंदोलन झाले पाहिजे. जाती संपवल्याशिवाय भारत कधीच जोडला जाऊ शकत नाही. जातींचा अंत झाला नाही, तर एक दिवस जातींमधलं भांडण इतकं वाढेल की कोणताच नेता ते सोडवू शकणार नाही. आजही आपल्याकडे केवळ जातीचे किंवा धर्माचे नेते आहेत, पण देशाचा नेता नाही. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथे धम्म मेळाव्यात लाखो लोकांना संबोधित करताना व्यक्त केल.

देशातील जाती व्यवस्था हजारो वर्षापासून टिकून आहे. येथील जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. येथील नवा मोंढा मैदानावर शनिवारी दुपारी धम्म मेळावा पार पडला. यावेळी अंजली आंबेडकर, रेखा ठाकूर, अशोक सोनवणे यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशाला तोडू पाहत असून येथील माणसाची डोकी भडकविण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. मोहन भागवत हे हिंदू धर्माला वैदिक धर्माकडे घेऊन जात असून सनातनी मानसिकता घडवू पाहत आहे. 
राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, मात्र येथील भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम करावे, केवळ पायी चालून उपयोग होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात आरक्षण वाचविण्याचे थोतांड नाटक सुरू आहे असेही ते म्हणाले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण खतम केले. आगामी काळात पैसे वाटून निवडणुका जिंकणाऱ्या पुढाऱ्यांची व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय पर्याय नाही. तोपर्यंत वंचित समूहाची सत्ता येणार नसल्याचे अँड. आंबेडकर यांनी आवर्जून सांगितले. भाजप सरकार हे सामान्यांचे नसून लुटारू असल्याचा घणाघात ही करायला ते विसरले नाहीत. 
राज्यातील शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीला येथील शेतकरीच जबाबदार असून शेतकऱ्यांनी जातीच्या सत्तेला महत्व दिल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. शेटजी आणि भटजी हे मुद्दाम ऊस असो किंवा कापूस यास भाव देत नसल्याने कापूस व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र त्याच शेतकऱ्यांच्या भरवश्यावर इथेनॉलमधून कारखानदार गब्बर होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाला प्रति टन ३ हजार भाव द्यावा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या