चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त नर्सी येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

पाणी हे निसर्ग निर्मीत असुनही सार्वजनिक ठिकाणचे पाणी घेवु दिल्या जात नव्हते म्हणुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी प्राशन करुन सत्याग्रह केला.या दिनाचे औचीत्य साधुन दि २० मार्च रोजी नर्सी येथील शासकीय विश्रामग्रहात महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना फुले शाहु आंबेडकर क्रांती मंच च्या वतीने अभिवादन करण्यात आले. 
       यावेळी फुले,शाहु,आंबेडकर क्रांती मंच प्रमुख भास्कर भेदेकर,सामाजीक कार्यकर्ते इंद्रजीत डुमणे, तलाठी विजय जाधव, भिमशाहीर गौतम भालेराव, खाजाभाई शेख, धम्मानंद भद्रे, मिलिंद बच्छाव, प्रकाश होनसांगडे, सुर्यकांत भेदे, किरण इंगळे, शिवाजी ईबितदार कुंटुरकर यांच्यासह फुले, शाहु आंबेडकर क्रांती मंच चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या