मुस्लीम स्मशानभुमी नजीकच्या नाल्याची साफसफाई; मुख्याधिका-यांनी घेतली वंचितच्या निवेदनाची दखल !

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
मुस्लीम बांधवाच्या स्मशानभुमीत नालीचे पाणी येत असल्याने नाली काढण्यात यावी यासाठी वंचित चे शहर अध्यक्ष सय्यद फिरदोस यांनी नगरपरिषदे ला निवेदन दिल होत. त्याची मुख्याधिकारी यांनी दखल घेऊन नाली साफसफाई करायला लावली आहे.

शहरात जि.प.हा.शाळा कुंडलवाडी रस्त्या शेजारी मुस्लीम बांधवांची स्मशानभुमी गेल्या अनेक वर्षापासुन आहे. येथे पुर्वजांच्या समाधी असलेल्या स्मशानभुमीच्या कडेने शहरातील वस्तीच्या नालीचे पाणी नाली फुटून स्मश्यानभुमीत येत होते. नाली जेसीबीने काढण्यात यावी यासाठी वंचित बहूजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष सय्यद फिरदोस यांनी नगरपरिषदेला निवेदन दिले होते. या निवेदनाची मुख्याधिकारी नरावाड यांनी दखल घेऊन नाली काढण्यासाठी आदेश दिले. सदरिल भास्करनगर, चौधरी गल्ली, नवि अबादी प्र.क्र.३ मधील नाल्याचे घाण पाणी मोठ्या नालीत मिसळून वाहनारे पाणी हे मुस्लीम स्मशानभुमिकडे वाहत असतांना येथील नगर परिषदेने नवि अबादी, बाजार गल्लीत पर्यत नाली काढली. परंतु येथील स्मशानभुमित असलेल्या समाधी वरुन नाली वाहत आहे. येथील नाली काढण्यासाठी व कचरा साफ सफाई करण्यासाठी पालिकेला निवेदनाद्वारे सय्यद फिरदोस यांनी दि. २२ नोव्हेंबर २१ रोजी कळविले होते पण या निवेदनाकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले.
सय्यद फिरदोस यांनी न.प.चे मुख्याधिकारी मा.नरावाड यांच्याशी संपर्क साधून स्मशानभुमितून नालीचे पाणी वाहत असल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत असे मत व्यक्त केले. मा.नरावाड यांनी फिरदोस यांच्या निवेदनाची दखल घेऊन दि.१४ डिसेंबर रोजी नाली काढण्यासाठी जेसेबी देऊन पालिकेचे कर्मचारी धर्मराज जाधव यांस पाठवून नाली ची साफसफाई केल्यामुळे येथील रहिवासी नागरीकांकडून पालिकेचे मुख्यधिकारी व अध्यक्ष यांचे अभार मानले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या