दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही? – चंपतराव डाकोरे पाटील

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी चार महिन्यांत संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेसोबत तिन बैठकीत दिव्यांग, वृध्द, निराधार यांच्या प्रश्नासाठी चर्चा करुन आदेश देऊनही जर न्याय मिळत नसेल तर दोषी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही असा सवाल चंपतराव डाकोरे पाटील यांनी विचारला आहे.

      दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना व संबंधित अधिकारी यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन, दोन वेळा धरने आंदोलन, एका वेळी आमरण ऊपोषण व प्रत्यक्ष भेटुन चर्चा करुन, एक वेळा दिव्यांग आयूक्त पुणे येथे बोंबा बोंब धरने आंदोलन केल्यामुळे दिव्यांग आयुक्त यांचे चार वेळा लेखि आदेश झाला तरी न्याय मिळत नसेल तर दिव्यांगाचा कायदा २०१६ , दप्तर दिरंगाई कायदा, हे फक्त कागदावरच आहेत काय?
दिव्यांगाना का? न्याय मिळत नाही? ते कमकुवत आहेत असे समजता का? त्यांना चालता येत नाहि, जगात काय चालले ते दिसत नाहि, जगात कोण काय बोलतो ते ऐकु येत नाहि, शासन, प्रशासनास बोलता येत नाहि, त्यांना संघर्ष करण्याची आर्थिक परिस्थिती नाहि, त्यांची बाजु मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी, मिडीया येत नाहि, ते कमकुवत आहेत म्हणुन त्यांना आपण न्यापासुन वंचित ठेवायचं का ?
 कांहि दिव्यांग आपल्या व्यंगाची पर्वा न करता “दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नहि ? हे दाखविण्यासाठी शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांग बांधव सनदशिर मार्गाने निवेदन, धरने व आपण दिलेल्या आश्वासनावर शांत राहातात.
   मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दि.१५ फ्रेबु.२०२३ पर्यंत आपल्या लेटरहेडवर संबधित अधिकारी यांना आदेश दिले कि, दिलेल्या मुदतीत निर्यण नाही झाल्यास संबंधित अधिकारी यांच्या वर शिस्तभंग कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.
     त्यांची आठवण दि.१७ फ्रेबु २०२३ ला निवेदनाद्वारे देऊन न्याय मिळाला नाहि. म्हणुन दि.३ एप्रिल २०२३ रोजी दिव्यांगांच्या पंधरा प्रश्नाला न्याय नाही.  न्याय हक्क तरी द्या नसेल तर कुत्र्यासारखे जिवन जगने अशक्य असल्यामुळे स्व.ईच्छा मरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत आहोत. तिही परवानगी नाहि दिल्यास दिव्यांग, वृध्द, निराधार आपल्या हक्कासाठी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करतील.
ती वेळ लोकप्रतिनिधी, प्रशासनाने येऊ देऊ नये असा इशारा दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र, मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील, ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे पाटिल, राजु शेरकुरवार, अनिल रामदिनवार प्रेमसिंग चव्हाण, उमेश भगत, विठ्ठलराव बेलकर, दादाराव कांबळे, शेख हनिफ, चांदु गवाले, बालाजी होनपारखे, रंजित पाटिल, शेख मगदुम, चांदरात चव्हाण, इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व माध्यमांशी बोलताना दिली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या