बिलोली तालुक्यातील केरूर येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या शाखेचे उदघाटन व मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
गावकर्यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मा चंपतराव डाकोरे पाटिल, जि अध्यक्ष ज्ञानेश्वर,नव़ले जी संपर्क प्रमुख नागोराव बंडे,ता अध्यक्ष बालाजी होनपारखे, मानसिंग वडजे,संरपच,बालाजी कुरणापल्ले तंटामुक्तीचे अध्यक्ष आ.बालाजी पाटिल प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचलन दिपक अलापुरे यांनी तर प्रस्ताविक दिंगाबर तरटे यांनी केले.
प्रस्ताविका बोर्ड अनावरण करण्याचा उद्देश स्पष्ट करुन दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी आपली संघटितपणे संघर्ष करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष डाकोरे पाटिल करीत असलेल्या चळवळीत सर्वानी सहभागी होऊन हक्काच्या सवलती घ्याव्यात असे आवाहन केले.
सरपंच यांनी दिव्यांग संघटना व सरपंच संघटना मिळुन संघटित पणे संघर्ष करून दिव्यांग वृध्द निराधार दिनदुबळ्याना न्यायासाठी संघटितपणे संघर्ष करावा असे आवाहन केले.
संस्थापक अध्यक्ष डाकोरे पाटिल यांनी आपल्या संघटित संघर्षामुळे आपणास गाव पातळीवर न मिळणारा निधी दरवर्षी मिळत आहे. पण ज्या लोकप्रतिनिधी यांना आपण खासदार, आमदार, केलात त्यांनी संसदेत दिव्यागंची बांधवांना दरवर्षी खासदार. आमदार निधी देण्यात यावा असा संसदेत कायदा करून तेच अंमलबजावणी करीत नाहीत. अशा चाळीस योजना कागदोपञी राहात असल्यामुळे, सर्वानि जागे होणे काळाची गरज असल्यामुळे गावागावात दिव्यांग जागा होण्यासाठी बोर्डाचे अनावरण करून सर्वानी एकजुटीने दिनदुबळ्याच्या लढाईत सहभागी व्हावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी सामाजिक कार्यकर्ते.नारायन आमोघे तरटे दिगाबर शेख शादुल नारायण भद्रे ता.आ.बालाजी होणपारखे शाखा प्रमुख.राजु श्रीरामे बाबु शेख हाजुमिया शेख शेख इस्माईल,ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्ध पाक ता अध्यक्ष बालाजी होनपारखे यानी दिली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy