जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल का – चंपतराव पाटील डाकोरे

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
दिव्यांग,वृध्द,निराधाराच्या अनेक प्रश्नासाठी जिल्हाधिकारी नांदेड येथे दोन वेळा आयोजित केलेले धरने आंदोलनाची दखल कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी नांदेड यांनी घेऊन २९ डिसे.२०२२ ला बैठक, दि.२३ जाने २०२३ ला सर्व खातेप्रमुखाची बैठक घेऊन आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यावर कार्यवाहि करतील काय असा सवाल चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी समाजमाध्यमातून केला आहे.

नांदेड जिल्ह्यात दिव्यांग ,वृध्द, निराधार यांच्या पंधरा प्रश्नासाठी तेरा निवेदन व आंदोलन करुन न्याय तर मिळत नाही, साधे ऊतर मिळत नसल्यामुळे दि.२७ डिसें.२०२२ पासुंन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ऑफिस वेळेत न्याय मिळेपर्यत बे-मुधत धरणे आदोलन दिव्यांग वृध्द, निराधार, मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वात करण्याचा निवेदनाद्वारे मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड निवेदनाद्वारे धरने आंदोलनाचे निवेदन दिले असता त्या निवेदनाची तात्काळ दखल
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन दि.२९ डिसेंबर २०२२ ला बैठक आयोजित करून सर्व पंधरा प्रश्न, संबधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन सोडविण्याचे लेखि अश्वासन व आंदोलन मागे घेण्यासाठी लेखि निवेदन जिल्हाधिकारी, व समाजकल्याण अधिकारी यांनी लेखि कळविल्यामुळे दि.२७ डिसेंबर २०२२ चे धरने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

 दि.२९ डिसे.२०२२ च्या बैठकित योग्य ते निर्णय नाहि झाल्यामुळे दि.२४ जाने.२०२३ ला बेमुदत धरने आंदोलन निवेदन दिले असता त्या निवेदनाची तात्काळ दखल नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन दि. २३ जाने.२०२३ ला बैठक आयोजित करून सर्व पंधरा प्रश्न संबधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करुन सोडविण्याचे लेखि अश्वासन दिल्यामुळे धरने आंदोलन मागे घेतले.
तरी दोन्हि बैठकित जिल्हाअधिकारी यांच्या आदेशाला कनिष्ठानी केराची टोपली दाखविल्यामुळे दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे दि. ८ फ्रेबु.२0२३ रोजी बोंबाबोम धरने आंदोलन केल्यामुळे दिव्यांग आयुक्त पुणे यांनी दि. २ जाने.२०२३ व दि.२१ फ्रेबू.२०२३ ला जिल्हाअधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना लेखि आदेशाला सुध्दा संबधित अधिकारी यांनी दखल न घेतल्यामुळे दि. १७ फ्रेबू.२०२३ ला जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे आपण १५ फ्रेबु.२०२३ पर्यंत न्याय देण्याचे अश्वासनाची पुर्ती करावी नसेल तर पुढील आंदोलनाची तारीक कळविण्यात येईल असे प्रसिध्दी पत्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जिल्हा स.प्रमुख नागोराव बंडे,जि.ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, जिव्हा सचिव अनिल रामदिनवार, वकिल आघाडीचे सरबिजीतसिंग, तेजपालसिंग, सविता गच्चे तुळशिराम दुधकवडे, काळबा सातपुते, शिवाजी आबादार ईत्यादीनी असे प्रसिध्दीपत्रक दिले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या