प्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन.

 [ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील हरिहर बापूदेव महाराज कोलंबीकर, मुकुंद बापूदेव महाराज कोलंबीकर, ह भ प वासुदेव बापुदेव महाराज कोलंबीकर, या तिन्ही बांधवांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन दिनांक 20 जून मंगळवार रोजी सकाळी 9:30 वाजता अंबिका मंगल कार्यालयात नायगाव बाजार जिल्हा नांदेड येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात चंद्रशेखर महाराज यांचे कीर्तन सोहळ्यानंतर सद्गुरु व सद्गुरु पुत्र , मातोश्री सह तिन्ही बांधवांचा तुलादान कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास सर्व आप्तसकीय मित्रपरिवार व भाविक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी कोलंबी कर परिवारांच्या वतीने करण्यात आली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या