नायगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पालखी मिरवणूक व ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणताराजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळा निमित्ताने नायगाव शहरात विविध कार्यक्रम आणि समाजीक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. जुन्या गावातील ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमान मंदीर येथे छत्रपतींच्या पालखीचे पुजंन खा.रवींद्र चव्हाण, श्रीमती सोनियाताई रविंद्र चव्हाण, चित्राताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती क्रांती डोंबे,तहसीलदार श्रीमती धम्मप्रिया गायकवाड, गजानन चव्हाण,पोलीस निरीक्षक मारकट, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिका सह अनेक मान्यवर मंडळी शिवभक्ताच्या उपस्थितीत करण्यात आले.
   शहरातून छत्रपती शिवरायांच्या पालखीची भव्य मिरवणूक कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवीन वस्त्र परिधान करून स्वतः तयार केलेले ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.शहरातील छत्रपती शिवाजी चौकात श्री च्यां पुतळ्याचे पुजंन खा.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी माजी पं.स.सदस्य हणमंतराव चव्हाण,माजी सभापती संजय बेळगे, नगराध्यक्ष प्रतिनिधी, संजय चव्हाण,यादव शिंदे,माणिक चव्हाण सह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
    या नंतर ढोलताशांच्या गजरात छत्रपतींच्या पालखीची मिरवणूक शहरातुन काढण्यात आली.जनता हायस्कूल व्यापारी संकुलात शहरातील नगरपंचायत बरोबर सर्वच शासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली.या निमित्ताने भगवे ध्वज घेवून युवक व बाल गोपालांनी सायकल रॅली काढली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या