छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटात साजरी !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 नायगाव येथील सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती डीजे ढोल ताशाच्या गजरात शिवाजी भव्य दिव्य मिरवणूक काढून साजरी केली. नायगाव येथील सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने  इरिगेशन कॅम्प ते नायगाव येथील जुन्या हनुमान मंदिरा पर्यंत डिजे ढोल ताशाच्या गजरात अतिशबाजी भव्य दिव्य मिरवणूक शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यासह राज्याभिषेक केलेल्या शिवाजी महाराज सिंहासनवर पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य दिव्य उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीतील समाज बांधवांसाठी निघताना जागोजागी समाज बांधवांनी पाणी पॉकेट, शरबत, चहा, बिस्कीट, खिचडी,चे वाटप करण्यात आले यावेळी मिरवणुकीचे नेतृत्व रंजीत पाटील कल्याण, साधू पाटील नरवाडे ,बंटी पाटील शिंदे, शिवा रामदिनवार ,कैलास पाटील शिंदे, हनमंत पाटील शिंदे , पांडू पाटील चव्हाण, शिवम पाटील कल्याण, बालाजी पाटील कल्याण , गिरी पाटील कल्याण, दिनेश पाटील कल्याण, सचिन पाटील कल्याण, यांच्यासह हजारोंच्या संख्येने युवक बांधव शिवप्रेमी समाज बांधव उपस्थित होते. 

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या