बिलोली येथील निवासी मुकबधीर विद्यालय रविंद्र नगर बिलोली येथे दि.९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य मुकबधिर विद्यार्थ्यांना शिवसेनाच्या वतीने ता.प्रमुख बाबाराव रोकडे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सदर मा.मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्य शालेय साहित्य वाटप करण्यासाठी गेलेल्या मान्यवरांचे निवासी मुकबधीर विद्यालयाकडून शिक्षकांनी यचोचित सत्कार व स्वाॕगत केला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरनीय एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या अनुसरून निवासी मुकबधीर विद्यालय बिलोली येथे बिलोली तालुका शिवसेना च्या वतीने विद्यार्थी /विद्यार्थींनीना शालेय साहित्य म्हणून वही/पेन वाटपाचा उपक्रमात मुख्यमंत्री आ.शिंदे यांना निरोगीदायी दिर्घ लाभो आणि त्यांच्या हस्ते महाराष्ट्रात सर्व उत्तम विकास कामे हो असे सदिच्छा शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव रोकडे यानी आपल्या मनोगतातून दिले.
मुकबधीर विद्यार्थ्यांना बोलता-ऐकता येत नसलेल्या विद्यार्थ्यांची भाषा समजने अवघड आहे, हे सर्वांना माहित पण या निवासी मुकबधीर विद्यालयाचे आम्ही सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांची परिभाषा समजुन घेऊन त्यांना स्वतःच्या मुलांसारखं प्रेम देत शिक्षणाचे धडे शिकवून त्यांना स्वच्छ टाॕप-टीप राहण्याची संस्कार शिकवले जाते, या विद्यालयाचे कांही शासकीय सेवेत आहे. असे मुंकबधीर विद्यालयाचे मुख्याद्यापक बालाजी ठक्कुरवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हणाले.
तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या हस्ते मुंकबधीर विद्यार्थ्यांना वही/पेन वाटप केले. यावेळी शिवसेनाचे ता.प्रमुख बाबाराव रोकडे,शहर प्रमुख रमेश पवणकर, शंकर मावलगे, विभाग प्रमुख वसंत पा.जाधव, अशोक पाटील खपराळा, गोविंद पा.हिप्परगा, पञकार राजू पा.शिंपाळकर, बाबूराव इंगळे, संजय पोवाडे, सुनिल जेठे, मुकबधीर विद्यालयाचे मुख्याद्यापक मा.बालाजी ठक्कुरवाड, श्री.व्हि.एम.देवाले, ए.जी.पाटील, सय्यद सर, भुसारे सर, मोकले सर, शेख सर, हंबर्डे सर, वस्तीगृह अधिक्षक माने यांच्यासह आदी कर्मचारी व शिक्षकांची उपस्थिती होती.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy