चिरली येथील खून प्रकरणातील एका आरोपीस उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर 

[ कुंडलवाडी प्रतिनिधी- अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरा जवळील मौजे चिरली येथे दि. 26 ऑक्टोबर 2022 रोजी जुण्या वादातुन एकाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे मयताचे वडील ईरवंत धोंडीबा धोंडापुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यातील आरोपीं हे न्यायालयीन कोठडीत असताना पोलीसांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.यानंतर आरोपीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय बिलोली येथे जामीन अर्ज केला परंतु न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला.
त्यानंतर आरोपींनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड.विनोद धोत्रे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला. माननीय न्यायमुर्ती एस. जी.मेहरे साहेब यांच्या समोर वेळोवेळी युक्तिवाद होऊन यातील एका आरोपीस मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडून सशर्त जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या