नागरिकांनी मतदान यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे – सौ.स्वाती दाभाडे

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
ज्या नागरिकाचे वय १८ वर्ष पूर्ण झाले अशा नागरीकाला मतदानाचा अधिकार असुन ज्याचे अद्याप मतदान यादीत नाव नाही अशा नागरीकांनी मतदान यादीत नाव समाविष्ट घ्यावे व मतदानाच हक्क बजावावा असे आवाहन नायगावच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा धर्माबाद च्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले आहे.
नायगाव तहसील कार्यालयात धर्माबाद च्या उपजिल्हाधिकारी तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने नागरिकांना आव्हान करण्यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की निवडणुकीत मतदान करण्याची संख्या पुरुषांपेक्षा महिलांची खूप कमी आहे मतदार राजांच्या संख्येवरूनही महिला मतदारांची कमी नावे मतदार यादी ला समाविष्ट असल्याचे आढळते. याचबरोबर तृतीयपंथी, काही वारंगणा ह्या व्यवसायाच्या निमित्ताने इतरत्र भटकतात त्यांनी आपल्या नावाचे मतदार यादीत समायोजन करून घ्यावे जेणेकरून आपणाला मतदानाचा हक्क बजावता येईल देशातल्या प्रत्येक 18 वर्षावरील नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे.
यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले नावे मतदार यादीत समाविष्ट करावे कुणाची नावे दोन ठिकाणी असतील तर ती एकाच ठिकाणी नोंदवून घेण्याची प्रक्रिया ही करून घ्यावी ज्यामुळे आपणाला मतदान करता येईल.
२१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत निवडणूक आयोगाच्या वतीने बि एल ओ मार्फत प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मतदाराची पडताळणी करणे तसेच नोदंणी न करण्यात आले आहे .येत्या २९ सप्टेंबर पर्यंत ओळख पत्रात बद्दल, तसेच मतदान यादीत त्रुटींची सुधारणा करण्यात येणार असुन या मतदान याद्या , दि.१७ करण्यात येणार असुन १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत .तर दि. २६ डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढून दि.५ जानेवारी २०२४ रोजी अंतीम मतदान यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे .
नायगाव तालुक्यात एकूण मतदारांची संख्या १४६९३९ असून त्यापैकी१४१५६९ मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झालेले आहे तर ४६१६ इतक्या मतदाराची पडताळणीचे काम शिल्लक आहे नायगाव तालुक्यातील एकूण १७१ मतदार केंद्रापैकी मतदान केंद्रावर आपल्या सुविधा मुळे स्थान बदल करणे बाबतचे ५ प्रस्ताव खालील प्रमाणे आहेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सुजलेगाव येथील मतदान केंद्र क्र .२५४ , २५५ पावसामुळे गळत असल्याने तर कोकलेगाव येथील मतदान केंद्र २३१ येथील केंद्राची जागा अपुरी पडत असल्याने तर कुंटूर तांडा येथील मतदान केंद्र क्र.१७५ नवीन अंगणवाडी ईमारत उपलब्ध असल्याने तर टेंभुर्णी येथील मतदान केंद्र क्र.३१४ मतदानाच्या वेळी पाऊस पडत असल्याने वरिल चार गावातील मतदान केंद्र बदलण्यात आल्याचेही उपविभागीय अधिकार स्वाती दाभाडे यांनी सागितले यावेळी तहसीलदार मंजुषा भगत निवडणूक पेशकार ग्रंथी हे उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या