कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ अनुश्री दरेगावकर रूजू !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
        येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गेल्या अनेक दिवसापासून कायम वैद्यकीय अधिकारी पद हे रिक्त होते, रिक्त असलेल्या जागेवर कायम वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर अनुश्री दरेगावकर हे दिनांक 18 रोजी रोजी रुजू होऊन आपला पदभार हाती घेतला आहे.
         महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य गट संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदाची जाहिरात निघाली होती या जाहिरातीच्या गुणवत्तेनुसार डॉ अनुश्री गोविंदराव दरेगावकर यांची कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिनांक 15 मार्च रोजी कायम वैद्यकीय अधिकारी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियुक्ती केली होती. त्या अनुषंगाने डॉ अनुश्री दरेगावकर हे दिनांक 18 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होऊन आपला पदभार हाती घेतला आहे.
          यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी ए एच मुंडे,एम ए गादेवार, सी एम जाधव, नीता पडलवार,सावंत सीस्टर,व्ही जी देवकांबळे, एस एम डोखले,आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.कायम वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाल्याबद्दल कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या