सिव्हिल राईट्स प्रोट्रे्क्शन सेलच्या तालूकाध्यक्ष पदी चंद्रभीम हौजेकर तर सचिव पदी गंगाधर वाघमारे यांची नियुक्ती.

धर्माबाद:-(तालुका प्रतिनिधी)

गेली तीस वर्षांपासून जनतेत कायद्याची जनजागृती करून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या सिव्हिल राईट्स प्रोट्रे्कशन सेलच्या(मानवाधिकार संरक्षन संघ)धर्माबाद तालुका अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार चंद्रभीम हौजेकर तर सचिव पदी जी.एम.वाघमारे याची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. इंजि.विवेक मवाडे,मुंबई दर्पण चे पत्रकार मनोहर जोधळे यांनी केलेल्या शिफारसी वरूण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद जीवने ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष किरण मेश्राम ,राष्टिय सचिव इंजि. माधवी जांभूळकर,सचिव मिना उके यांनी चंद्रभीम हौजेकर आणि जी .एम. वाघमारे यांची नियुक्ती करून अभिनंदन केले आहे.
सिव्हिल राईट्स प्रोट्रे्क्शन
सेलच्या(मानवाधिकार संरक्षन संघ) ही सामाजिक संघटना फूले शाहू आंबेडकरी विचाराचे अधिकारी, डॉक्टर, वकील ,सेवानिर्वत्त न्यायधिश ,आय. ए .एस.,आय.पि.एस.,पत्रकार, लोकांचें तीस वर्षांपासूनची ही सामाजिक संघटना असुन प्रत्येक राज्यात या संघटने मार्फत सर्व स्तरातील नागरिकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी,अन्याय ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे.
या संघटने मार्फत धर्माबाद तालुक्यातील शासकीय ,निमशासकीय व खाजगी कार्यालयातील आणि वयक्तिक
नागरिकांच्या समस्या व प्रश्नाची सोडवणूक करण्यात येईल.
वरिल झालेल्या निवडी बद्दल पत्रकार चंद्रभीम हौजेकर आणि जी.एम.वाघमारे याचें मित्र परिवारातून अभिनंदन केले जात आहे.

ताज्या बातम्या