जिल्हाधिकारी 20 ऑक्टोबर रोजी धर्माबाद तहसील कार्यालयात प्रशासकीय आढावा बैठक घेणार.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद तालुक्यांतील विकास विषयक प्रश्नांच्या बाबत दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा तीस वाजता जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे या बैठकीत विकास विषयक घडामोडी सह प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
बिलोली, देगलूर, धर्माबाद या तेलंगणा सीमा भागातील विकास विषयक प्रश्नांच्या बाबत जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने विविध बैठका घेऊन विकास विषयक घडामोडींना गती देण्याचे काम करण्यात आले होते. असे असले तरी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. या विकास विषयक घडामोडीत सर्व स्तरातील लोकांसह विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन नांदेड, बिलोली आणि देगलुर येथे बैठकीच्या माध्यमातून प्रशासनाकडून प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न झाला.
गेल्या वर्षी सीमा भागातील प्रश्न समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्रपणे माहिती संकलित केली होती. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणा सीमा भागातील विकासाविषयी अर्थसंकल्पीय भाषणात निवेदन केले. यापूर्वी खासदार प्रतापराव पाटील यांची जिल्हाधिकारी अभिजित राऊत व प्रमुख समन्वयक यांच्या उपस्थितीत नांदेड येथे बैठक झाली होती. असे असले तरी याबाबत मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक अद्याप झाली नाही.
नुकतेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रत्यक्ष भेटीत सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी याविषयी संक्षिप्त विवेचन केले. यापूर्वी देगलूर आणि बिलोली येथे उपजिल्हाधिकारी श्री सचिन गिरी यांनी या विषयावर स्वतंत्र बैठक घेतली होती. एकंदरीत प्रशासकीय कामाचा आढावा आणि विकास विषयक घडामोडी बाबत दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता धर्माबाद येथे स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी सांगितले.
विशेष म्हणजे तत्कालीन खासदार खासदार अशोकराव चव्हाण यांची कै. रावसाहेब अंतापूरकर आणि वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील याबाबत बैठक झाली होती. प्रशासकीय येथे एकही बैठक झाली नसल्याचे काहींनी नमूद केले. प्रशासनाची धर्माबाद येथे पहिल्यांदाच बैठक होत आहे. या बैठकीत होट्टल प्रमाणे धर्माबाद तालुक्यांतील संगम महोत्सव, सीमा भागातील विकासाचा आराखडा, यासह शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते हे प्रश्न अधिक चर्चेला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या