धरमतर ते अलिबाग या खड्ड्यांनी “समृद्ध” असलेला मार्ग NH166A वरील खड्डे आणि ईतर रस्ता दुरूस्तीच्या कामांची तिन दिवसात वर्कऑर्डर काढण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर साहेब यांनी NHAI च्या अधिकार्यांना दिले.

[ अलिबाग प्रतिनिधी : – अभिप्राव पाटील. ]
दि.२६/१२/२०२२ रोजी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथम निवासी उपजिल्हाधिकारी पद्धश्री बैनाडे मॅडम आणि नंतर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर साहेब यांच्या सोबत जवळ जवळ दोन तास चाललेल्या बैठकी नंतर जिल्हाधिकारी साहेबांनी सदर आदेश दिले.
या बैठकित जनतेच्या वतीने खड्डे ॲक्टिवीस्ट दिलीप जोग, मनसेचे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णू पाटील , राजेश टेमकर, गुरूनाथ पाटील, अनुज पालकर , समिर पालकर तर संबंधित रस्त्याचे जबाबदार NHAI पनवेलचे गोठकर साहेब, NHAI पेणचे, व PWD अलिबागच सुखदेव साहेब ईत्यादी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या