राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी आंदोलन समन्वय समिती नांदेड चे जिल्हाधिकारी यांना निवेदन

( जिल्हा प्रतिनिधी नांदेड – आनंद सुर्यवंशी )

राष्ट्रीय शिक्षा नीती विरोधी आंदोलन समन्वय समिती नांदेड शाखेच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सदरील निवेदनात खालील मागण्या अंतर्भूत आहेत.

१. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करावे

2. शिक्षणाचे खाजगीकरण,बाजारी करण बंद करावे,

3.समान शाळा पद्धतीचा पुरस्कार करावा,

4.राज्याच्या अधिकारावर आणलेली गदा मागे घेण्यात यावी.

5.शिक्षणावर सकल उत्पन्नाचा 10 टक्के खर्च करावा

6.शिक्षकांकडील सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे काढुन टाकावी.

7.इंग्रजी माध्यमाला अंकुश लावावे.

8.निर्णयाचे केंद्रिकरण मागे घेऊन लोकशाही व लोका भिखुर रचना उभी करावी.

9. राज्य घटनेतील मुल्य संस्कृतीवर आधारित शिक्षण आशयाचा पुरस्कार करावा.

10. शिक्षक / प्राध्यापकाची भरती केंदिय पध्दतीने करावी.

11. पुर्व प्राथमिक शिक्षकांना वेतन श्रेणी व सेवा सुरक्षा देण्यात यावी.

सदरिल निवेदन प्रधानमंत्री भारत व मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना पाठविण्यात आले. निवेदनावर आंबेडकरी आंदोलन समितीचे व शिक्षा निमी विरोधी आंदोलनाचे नांदेड जिल्हा मुख्य समन्वयक प्रा.डॉ. आनंद भालेराव, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे माजी राज्यसचिव मनेष खटावे,राहुल गच्चे, भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे कॉ. गंगाधर गायकवाड, फुले – आबेडकरी चळवळीचे प्रा.अशोक गेडाम, प्रा.डॉ. चंद्रमनी भोवते, बी.एम. वाघमारे, अजय हिवरे आदीचा सह्या आहेत.

ताज्या बातम्या