आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान वाटप !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाचे वाटपाला आज देगलूर बिलोली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदारश्री जितेश रावसाहेब अंतापूरकर त्यांच्या हस्ते सुरुवात केली. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचे नुकसान झाले होते त्या नुकसानीमुळे महा विकास आघाडी सरकारने नांदेड जिल्ह्याला निधी मंजूर केला होता. परंतु अचारसंहितेमुळे वाटप करता आले नाही.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड चे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज पासून देगलूर बिलोली तालुक्यातील अनुदानाचे वाटप सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी माननीय पालक मंत्री महोदय यांनी देगलूर बिलोली तालुक्यातील 45 हजार 794 क्षेत्र बाधित झाले असता त्यासाठी 62 हजार 126 शेतकरी पात्र अनुदानाचा लाभ मिळणार आहे या वाटपाचे सुरुवात मरखेल व हणेगाव सर्कल मधून देगलूर बिलोली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार श्री जितेश रावसाहेब अंतापूरकर पंचायत समितीचे मा.सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रामराव नाईक देगलुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रितम देशमुख नांदेङ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पवन देशमुख हणेगाव जि.प.सदस्य प्रतिनिधी दिलीप बंदखङके मरखेल सर्कल चे नेते ङाॅ धुमाळे सर व तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या