मिलिंद प्राथमिक शाळेत रांगोळी स्पर्धा संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील सर्वदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक शाळेत दिनांक 27 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलींची शाळेत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक डी.एस.पांचाळ धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सहशिक्षीका सौ अर्चना पोतनकर आणि सौ.शिंदे मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम केले. यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील कार्यक्रमात पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी शाळेतील सहशिक्षक सिद्धार्थ तुरे आणि जी.एस.गडपवार यांनी सहकार्य केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या