महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक नायगांव तालुकाध्यक्षपदी गणेश चोंडे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर पवार यांची निवड जाहीर !

[ नायगांव ता.प्र – गजानन चौधरी ]
   माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रराज्य संगणक परिचालक संघटनेच्या नायगांव तालुका अध्यक्षपदी गणेश चोंडे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर पवार यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे.

   मागील काही दिवसांपासून बरखास्त असणाऱ्या नायगाव तालुका कार्यकारिणी ची काल शनिवारी नायगांव पंचायत समिती कार्यालय येथे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिध्देश्वर मुंडे यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा अध्यक्ष संग्राम ढिकळे व जिल्हा सचिव टी.व्ही. बैनवाड (मामा) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जेष्ठ पत्रकार तथा संगणकपरीचालक गंगाधरराव गंगासागरे, बिलोलीचे माधव पाटील, कंधारचे नागेश पाटील, मयुर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून यावेळी तालुका अध्यक्ष म्हणून गणेश चोंडे तर उपाध्यक्ष म्हणून रामेश्वर पवार, सचिव तिरुपती जाधव, संपर्कप्रमुख गजानन कदम यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे.
 इतर उर्वरित कार्यकारिणी पुढील बैठकीमध्ये जाहीर करण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संग्राम ढिकळे व जिल्हा सचिव तुळशीराम मामा बैनवाड यांनी संगणक परिचालकांच्या प्रमुख मागण्यासाठी राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्या नेत्रत्वाखाली संघटनेचा लढा सरकारसोबत सुरू असून आगामी काही दिवसात आपणास नक्कीच अच्छे दिन येतील असा विश्वास व्यक्त केला.

   या बैठकीला नागेश जाधव, बालाजी म्हेत्रे, रामनाथ काचेमवार, बाजीराव ढगे, मालू झगडे, पांडुरंग बनसोडे, दीपक बच्छाव, विश्वंभर शिंदे, किरण हनमंते, बालाजी वाघमारे, शैलेश जाधव, मारुती कदम, गंगाराम पांचाळ, सय्यद मस्त, गंगासागर सज्जन, गुलाब वानखेडे, आनंदा कदम, नागेश जाधव, खुशाल शिंपाळे, संदीप कांबळे यांसह आदी संगणक परिचालक उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या