दिव्यांग वृद्ध निराधार मेळावा संपन्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]

येथील साईबाबा मंदिरात दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग वृद्ध निराधार मेळावा संपन्न झाला असून या मेळाव्यात दिव्यांग व्यक्तीच्या विविध समस्या,व शासनाच्या विविध योजनेचा आढावा घेऊन दिव्यांग व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी होनपारखे,संतोष नरवाडे, हनमंलु कोनेरवार,रवींद्र भोरे,सावित्रा समेटवार, शोभा झंपलकर आदी उपस्थित होते.
तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सयाराम भोरे,विनोद काळेवार, दत्ता हमंद,शिवकुमार गंगोने,अनिल पेंटावार,साई येपुरवार,गंगाधर कल्यापुरकर,सोमेन्द्र महाराज,साईनाथ नीलमकर आदीने परिश्रम घेतले आहेत.या कार्यक्रमाला शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्तीसह वृद्ध नागरिक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या