महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी डॉ.मोईज शेख यांची निवड !

[ म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
म्हसळा नगर पंचायतचे व म्हसळा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ मोईज शेख यांची महाराष्ट्र राज्य कमेटीचे अध्यक्ष मा. नाना पाटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नेमणूक करून म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील काँग्रेस पक्षाला नव संजीविनी देण्याचे काम केले आहे असा काँग्रेस कार्यकर्त्यांमधून सूर येत आहे.
डॉ मोईज शेख यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष्याचे विचार तळागाला पर्यंत पोहचवण्याचे काम इमाने इतबारे डॉ मोईज शेख यांनी केलेले आहे. आज घडीला तसे पाह्यला गेले तर म्हसळा, श्रीवर्धन मतदार संघात काँग्रेस पक्ष टिकवण्याचे काम डॉ शेख यांनी केलेलं आहे.
त्यांच्यातल्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे. रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत, महिला काँग्रेस अध्यक्ष श्रद्धा ठाकूर, जेष्ठ नेते मुश्ताक अंतुले म्हसळा शहर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डॉ शेख यांचे अभिनंदन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या