कुंडलवाडी शहर युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी डॉ प्रशांत सब्बनवार

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 येथील डॉ प्रशांत गंगाधरराव सब्बनवार यांची कुंडलवाडी शहर युवक काँग्रेस च्या शहर अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
    सविस्तर वृत असे की, आजपर्यंत पक्ष संघटनेतील कामाची दखल घेत डॉ प्रशांत गंगाधरराव सब्बनवार यांना युवक कॉंग्रेस च्या शहर अध्यक्ष ची नियुक्ती करण्यात येत आहे.

तसेच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांच्या नेतृत्वाखाली काम करावे काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार समाजातील सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन व पक्ष शिस्त पालन करून पक्ष संघटन मजबूत करावे नियुक्ती पत्रात उल्लेख करत तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांच्या स्वाक्षरी ने हे नियुक्ती पत्र नांदेड जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर ,माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार डी पी सावंत, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर,जिल्हा उपाध्यक्ष आनंद पा.बिरादार तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पचपिंपळीकर युवक तालुका अध्यक्ष श्रीनिवास पा.शिंदे यांच्या उपस्थितीत हे नियुक्ती पत्र देण्यात आले या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या