म्हसळा काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ मोईज शेख यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याने तालुक्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये उस्तहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्ते, पदधिकारी यांनी डॉ मोईज शेख यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ.शेख यांनी ज्या पद्धतीने तालुक्यात काँग्रेस पक्षात काम केले सोबतच सामन्यांना जोपासण्याचे काम हि केले वेळ प्रसंगी त्यांच्या अडचणी कश्या पद्धतीने दूर होतील ते जातीने लक्ष घालत असे. सर्व सामान्य कार्यकर्ता यांच्याही समस्या जाणून घेत असे. म्हसळा तालुक्यात काँग्रेस टिकून ठेवण्याचे कार्य डॉ साहेबाने आणि कार्यकर्त्यानी केले आहे मागच्या काही काळत पक्ष पाठी मागे पडलेला होता तो आत्ता निश्चित पुढे जाईल कार्यकर्ते पदाधिकारी नव्या उत्साहाने पक्ष बळकटी साठी कामाला लागतील.
डॉ.मोईज शेख यांना दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने ते पार पाडतील असे काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते रफी घरटकर यांनी मत व्यक्त केले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये शहरातील नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकान मध्ये काँग्रेस बदलेली दिसेल. मा.डॉ.मोईज शेख यांच्या निवडीने काँग्रेस पक्षातील मरगळ दूर होईल कार्यकर्ते एकदिलाने आणि जबाबदारीने काम करतील असे काँग्रेस शहर अध्यक्ष बाबा हुरजूक यांनी मतवेक्त केलेले आहे.
पुढील वाटचाली साठी डॉ मोईज शेख यांना शुभेच्या देऊन अभिनंदन केले . म्हसळा काँग्रेस कार्यकर्ते, तालुका सरचिटणीस रवी दळवी, उपाध्यक्ष द्वारकानाथ पाटील, महिला तालुका अध्यक्ष नीलम वेटकोळी, युवा काँग्रेस शहर अध्यक्ष सुफियान हळदे , विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मन्सूर धनसे, सलीम धनसे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यानी अभिनंदन आणि शुभेच्या दिल्या.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy