काँग्रेस पक्षाने चार वेळा मुख्यमंत्री दिलेल्या नांदेड जिल्ह्यांतील जनतेनी महायुती सरकारला दिलेल्या बहुमतांचा साधा मंत्री ही न देता अपमान केला आहे. – श्री. केदार पाटील साळुंके

[ बिलोली प्रतिनिधि – सुनिल जेठे ]

– नांदेड जिल्ह्यांच्या आज पर्यंतच्या राजकीय इतिहासात काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्याला अनेक वेळा मंत्री, चार वेळा मुख्यमंत्री तर; केंद्रीय गृहमंत्री अशा देशाच्या सर्वोच्च पदांवर संधी दिली असता त्याच जिल्ह्याने आज जिल्ह्यातील नऊच्या नऊ जागा भाजपा – महायुतीला दिल्या मात्र; साधे मंत्रीपदही दिले नसल्याने भाजप – महायुतीने नांदेडच्या जनतेचा अपमान केला असल्याचं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस, श्री. केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केलं आहे.
काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यांच्या राजकारणामध्ये आजपर्यंत प्रत्येक वेळी जिल्ह्याला मंत्रीपद तर दिलेचं तर त्याहून अधिक चार वेळा मुख्यमंत्रीचं नव्हे; तर देशाचे सर्वोच्च केंद्रीय गृहमंत्री पदं ही दिलेलं आहे. मात्र; आज घडीला केंद्रामध्ये भाजपा – एन. डी. ए. चे सरकार आहे जिल्ह्यात भाजपचे दोन खासदार आहेत, तर; महाराष्ट्रामध्ये देखील नव्याने भाजपा – महायुतीचे सरकार स्थापन झालेलं आहे. या सरकारच्या बाजूने नांदेड जिल्ह्याने नऊच्या नऊ जागा महायुतीला दिलेले आहेत तर; एक विधान परिषदेत पाठवलेलं आहे. असे दहा आमदार असतानाही आणि त्यांमध्ये कोणी दोन टाईम, तर; कोणी तीन टाइम असे निवडून आलेले आमदार असतानाही त्यांना मंत्रीपदाची संधी दिलेली नाही तर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसने एकदाच आमदार झालेल्या नवख्या आमदारांना देखील मंत्रीपद देऊन जिल्ह्याचं पालकमंत्री केलेलं होतं हा काँग्रेसचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
मात्र; अनेक वेळा निवडून आलेल्या आजच्या आमदारांनाही टाळून एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या जिल्ह्याला जाणीवपूर्वक मंत्री पदांपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता विकासासाठी दुसऱ्याच्या हाताकडे बघण्याची वेळ आली आहे हा खऱ्या अर्थाने जिल्ह्याला विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तर आहेच पण येथील जनतेने दिलेल्या बहुमतांचा देखील हा अपमान आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येथील जनतेने महायुतीला धडा शिकवण्याचं काम केलं पाहिजे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या