नायगांव तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी माधव पा.हिवराळे यांची निवड

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी ]
नायगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी राहेर येथील माधव बालाजी हिवराळे यांचे निवड झाल्याने सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री श्री आशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार नुकतेच नायगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्याची अनुसूचित जातीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी राहेर येथील माधव बालाजी पाटील हिवराळे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मा.आ.श्री.वसंतराव पा.चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्री. श्रीनिवास पा.चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, भावी आमदार युवा नेते प्राचार्य रवींद्र पाटील चव्हाण, अनुसूचित जाती जमाती काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे मनोहर पवार, उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बालाजीराव मदेवाड, दत्तात्रय आईलवार, पांडू पाटील चव्हाण ,बालाजी शिंदे, माणिक चव्हाण, राहेर तंटामुक्ती अध्यक्ष श्री.प्रकाश पाटील हिवराळे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या